Showing posts with label झेंडा (२०१०). Show all posts
Showing posts with label झेंडा (२०१०). Show all posts

सांग ना रे मना,Sang Na Re Mana

अंतरी वाजती प्रीतिची पैंजणे आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना

श्वास गंधाळती, शब्द भांबावती, रोमरोमांतली कंपने बोलती
मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी, भारलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना, सांग ना रे मना

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली, ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली
गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली, हे शहारे जणु रेशमाच्या झुली
आज ओथंबल्या का अशा भावना, सांग ना रे मना

सावधान वणवा पेट,Savadhan Vanava Pet

सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

काळोखाच्या साम्राज्याला तीट लावून भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जागणार नाय
उठ मराठ्या क्षितीज बघ तुला साद देत आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

मरहट्यांच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
प्रधान इथले मस्तवाल अन्‌ सुस्त जाहले मावळे
असो पहाडापरी शत्रू पण तू सुरूंग आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ,Vitthala Konata Zenda Gheu

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळति वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं, उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रीती, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

पत्रास कारण की,Patras Karan Ki


पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही

माफ कर पारो मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पिकाला ग नाही कवड्या भेटल्या
"चार बुकं शिक" असं कसं सांगु पोरा
"गहाण ठेवत्यात बापाला का?" विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जिमीनीनं सारं पिकं गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळा धारा
कर्जापायी भटकून शिर्पा ग्येला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही

आई तुझ्या खोकल्याचा आवाज घुमतो कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामंच ते, जीव द्याया आलं कामी
माजं अन्‌ सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकऱ्या किमत न्हाई