सांग ना रे मना,Sang Na Re Mana

अंतरी वाजती प्रीतिची पैंजणे आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना

श्वास गंधाळती, शब्द भांबावती, रोमरोमांतली कंपने बोलती
मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी, भारलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना, सांग ना रे मना

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली, ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली
गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली, हे शहारे जणु रेशमाच्या झुली
आज ओथंबल्या का अशा भावना, सांग ना रे मना

No comments:

Post a Comment