Showing posts with label गुळाचा गणपति (१९५३). Show all posts
Showing posts with label गुळाचा गणपति (१९५३). Show all posts

श्रीहरी विदुराघरि पाहुणा ShriHari Vidura Ghari

सुवर्णद्वारावतीचा राणा


श्रीहरी विदुराघरि पाहुणा !


मिष्टान्ने कोठुन ? आणिला कणिकोंडा रांधुन


सांगे आवर्जुन, भाबडी विदुराची सुगरण


वानी रुचकरपणा


श्रीहरी विदुराघरी पाहुणा !




कवळ मुखी नेतसे, मागुनी पुन्हा पुन्हा घेतसे


तृप्त मनी होतसे, तृप्तिची ढेकर वर देतसे


विसरे जलपाना


श्रीहरी विदुराघरी पाहुणा !




प्रेमळपण आगळे, चाटितो उरलीसुरली दळे


योग्यांना ना मिळे, मूर्त ते परब्रम्ह सावळे !


काय लाडकेपणा


श्रीहरी विदुराघरी पाहुणा !

केतकीच्या बनात,Ketakichya Banat

केतकीच्या बनात
उतरत्या उन्हात
सळसळ पानात-
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-

कुठे निघेल नाग !

पायवाट लपेल
काटाकुटा रुपेल
तळव्यात खुपेल-
जपून जा !

ढग येता दाटून
मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून-
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !

उसळत्या वयात
बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात
जपून जा !

फसू नको मोहात

जरा उभी रहात
मागेपुढे पहात
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !


वादळाच्या वाऱ्यात
नको चालू तोऱ्यात
पडशील भवऱ्यांत
जपून जा !

जाऊ नको गुंगत
स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत
जपून जा !

जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !