भारती सृष्टीचे सौंदर्य,Bharati Srushtiche

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दावीत सतत रूप आगळे

वसंत वनांत जनांत हासे
सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र-वैशाखाचा ऐसा हा थाट

ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरून
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे

श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण-जन्माची दंगल उडे
बांधीती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे



2 comments:

  1. अप्रतिम कविता , सुंदर चाल.

    ReplyDelete
  2. खूप छान निसर्ग वर्णन

    ReplyDelete