Showing posts with label कामापुरता मामा (१९६५). Show all posts
Showing posts with label कामापुरता मामा (१९६५). Show all posts

रात्रीच्या धुंद समयाला,Ratrichya Dhund Samayala

रात्रीच्या धुंद समयाला शिणगार साज मी केला
सख्या घडीभर बसुनी बोला

हृदयाची कळी जागली शिणवली नयन बाहुली
वाट बघुनि जीव हा थकला

ओठांत भाव थरकले घुंगरू छननन वाजले
बांधला सुरांचा झोला

तबकात विड्याचा थाट केशरी गंध वाऱ्यात
प्रणयास आगळा थाट चौरंग बाहुंचा केला

नाकी डोळी नीट डाव्या,Naki Doli Neet Davya

नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथे खुलायची, पुरषांची जात तिथे फसायची !

रंगमहालाचा हिरवा रंग, खुलवितो प्रितीचा रंग
घ्यावा अनुभव बसून संग
पडली हवा थंडगार, अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथे विझायची, पुरषांची जात तिथे फसायची !

कधी रागाचा नकार लटका, गोऱ्या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरिपटका
तिकडं दावुनिया हुल, इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची, पुरषांची जात तिथे फसायची !

मुखी विडा रंगला केशरी, श्वासात मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार, वाजे तुणतुण्याची तार
मुजऱ्याला मान जिथे लवायची, पुरषांची जात तिथे फसायची !

जीवनात ही घडी अशीच,Jivanat Hi Ghadi Ashich

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातिल चांदवा जीवास लाभु दे

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे