रात्रीच्या धुंद समयाला,Ratrichya Dhund Samayala

रात्रीच्या धुंद समयाला शिणगार साज मी केला
सख्या घडीभर बसुनी बोला

हृदयाची कळी जागली शिणवली नयन बाहुली
वाट बघुनि जीव हा थकला

ओठांत भाव थरकले घुंगरू छननन वाजले
बांधला सुरांचा झोला

तबकात विड्याचा थाट केशरी गंध वाऱ्यात
प्रणयास आगळा थाट चौरंग बाहुंचा केला

No comments:

Post a Comment