का रे दुरावा ,कारे अबोला KAARE DURAWA ,KAARE ABOLA



का रे दुरावा ,का रे अबोला
अपराध माझा असा काय झाला
का रे दुरावा ,का रे अबोला
अपराध माझा असा काय झाला
का रे दुरावा ,का रे अबोला

नीज  येत नाही ,मला एकटीला ,कुणी ना विचारी धरी कुनवटीला
नीज येत नाही ,मला एकटीला ,कुणी ना विचारी धरी कुनवटीला
मान वळविते ती ,वेगळया दिशेला ,
अपराध माझा असा काय झाला
का रे दुरावा ,का रे अबोला
तुझ्या वाचुनही,रात जात नाही ,
जवळ ये जरा ये ,हळु बोलु काही
तुझ्या वाचुनही,रात जात नाही ,
जवळ ये जरा ये ,हळु बोलू काही
हात चांदण्यांचा घेई उश्याला
अपराध माझा असा काय झाला
का रे दुरावा ,का रे अबोला
रात जागवावी ,असे आज वाटे ,
तृप्त झोप यावी ,पहाटे पहाटे ,
रात जागवावी ,असे आज वाटे ,
तृप्त झोप यावी ,पहाटे पहाटे ,
नको जागने हे ,नको स्वप्न मला
अपराध माझा असा काय झाला
का रे दुरावा ,का रे अबोला


Lyrics - ग. दी.माडगुळकर G.D.MADAGULKAR
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -मुंबईचा जवाई  MUMBAICHA JAWAI

No comments:

Post a Comment