श्रीरामाचे दर्शन घडले Shriramache Darshan Ghadle- Sumati Tikekar (Bhaktigeet)


श्रीरामाचे दर्शन घडले
पाषाणातुनी शब्द उमटले

अपराधाची जाणिव नसता
घडले काही दीनानाथा
गुन्हेगार मी गौतम वदता
अपराधाने लाज्जित झाले

अपराधाचे शासन म्हणुनी
भूवरी पडले शीळा होऊनी
आज संपली करूण कहाणी
पद स्पर्शाने पावन झाले

पतितांना तू करिसी पावन
जन वदती तुज पतीतपावन
सरले माझे देवा मीपण
तुझ्या कृपेने जीवन सरले

Lyrics   -    Yogeshwar Abhyankar योगेश्वर अभ्यंकर
Music   -    M G Gokhale  ‍एम्‌. जी. गोखले
Singer  -   Sumatee Tikekar  सुमती टिकेकर 

No comments:

Post a Comment