संसार हा सुखाचा,Sansar Ha Sukhacha

संसार हा सुखाचा, मी अमृतात न्हाते
माझ्या मनात कोणी, अंगाई गीत गाते

तू देवरूप माझे मी एकरूप झाले
हिंदोळते उरी मी मन मोहरून आले
वात्सल्य आणि प्रीति जुळले नवीन नाते

वेलीवरी कळीचे झाले फुलून फूल
येता सुगंध वारा पडली तिलाच भूल
दारातल्या तरूला फळरूप आज येते

या भावरम्य लाटा हा सागरी किनारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
मज वेगळेपणाचे अपरूप आज वाटे

No comments:

Post a Comment