सांग तू माझाच ना,Sang Tu Majhach Na

सांग तू माझाच ना ?
राहू कशी तुझियाविना

चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले, गुंतले
भासते उतरून खाली स्वर्ग ये जणु पाहुणा

भेट होता एक; झाले मी नवी, जगही नवे
वाटते; आले जुळूनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा, स्वप्न लाभे लोचना

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्नातही, मनमोहना !

No comments:

Post a Comment