यतिमन मम मानित त्या,Yatiman Mam Manit Tya

यतिमन मम मानित त्या
एकल्या नृपाला ।
आदिअंत ज्यास नसे
त्या सनातनाला ॥

गगनधरा ज्या निवास
बंधन भय नाहि त्यास
समिर करिल काय नमन
सधन सागराला ॥

1 comment:

  1. धन्यवाद. कृपया या बोलांबरोबरच कवि, गायक, संगीतकार , नाटक वा चित्रपट, राग यांचीही माहिती द्यावी. एकाच जागी या सर्व गोष्टी मिळू देत. ती माहिती संग्रही ठेवता येईल.

    ReplyDelete