यमपाश, गळ्याशीं ज्यास लागला,
त्यास मला कां देतां ? ।
कां मांस विकुनि, धर्मास वाकडे जातां ? । (चाल)
पाळिलें घातलें खाया, अजवरी ।
बकरीस मोल बहु याया, ज्यापरी ।
ही तुमचि मुलीवर माया, कां खरी ? ।
जगतांत, सदय सकळांत माऊली तात,
मुलीला असतां ।
मग तुम्हीच इतके कां गे होतां ॥
त्यास मला कां देतां ? ।
कां मांस विकुनि, धर्मास वाकडे जातां ? । (चाल)
पाळिलें घातलें खाया, अजवरी ।
बकरीस मोल बहु याया, ज्यापरी ।
ही तुमचि मुलीवर माया, कां खरी ? ।
जगतांत, सदय सकळांत माऊली तात,
मुलीला असतां ।
मग तुम्हीच इतके कां गे होतां ॥
No comments:
Post a Comment