मुकेपणाने करिसी सेवा, तूच एकला मला विसावा
दुवा काय मी तुजला द्यावा, यशवंत हो, जयवंत हो !
दुबळ्यापोटी जन्मलास तू, नकोस दुबळा ठरू परंतु
पुरेच कर तू माझे हेतू, यशवंत हो, जयवंत हो !
बाळपणी तुज छळिते विपदा, थोरपणी तू मिळव संपदा
धनवंताना जिंक दहादा, यशवंत हो, जयवंत हो !
व्यर्थ जन्म रे विद्येवाचुन, ज्ञान जगातील घेई वेचुन
कीर्ति आण तू पायी खेचुन, यशवंत हो, जयवंत हो !
तू अंधाच्या हाती काठी, तू कुलदीपक आईपोटी
तूच एक मज पुढती पाठी, यशवंत हो, जयवंत हो !

No comments:
Post a Comment