यश हे अमृत झाले,Yash He Amrut Jhale

यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले

दिग्वीजयाच्या मनोरथावर, नक्षत्रांचे झुलते अंबर
मागे पुढती राजपथावर, लक्ष दीप लागले

स्तुतिसुमनांचे उधळित झेले, जनगौरव तो जय जय बोले
कीर्तध्वजावर लावून डोळे, भाग्य पुढे चालले

वैभव मिरवीत मंदिरी येता, दिसे न डोळी ती मंगलता
सुख अंधारी मन व्याकुळता, दु:ख सुखे हासले

यश हे अमृत झाले
सुख स्वर्गीचे आले
परि दु:ख सुखे हासले

No comments:

Post a Comment