राजसा जवळी जरा बसा,Rajasa Javali Jara Basa

राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पीसा, तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही

त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठात

ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा, देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार

मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रातNo comments:

Post a Comment