पुण्य पर‍उपकार पाप ते,Punya Par Upakar Paap Te

पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा ।
आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

सत्य तो ची धर्म, असत्य तें कर्म ।
आणिक हे वर्म नाहीं दुजें ॥२॥

गति ते चि मुखी नामाचें स्मरण ।
अधोगति जाण विन्मुखता ॥३॥

संतांचा संग तो चि स्वर्गवास ।
नर्क तो उदास अनर्गळ ॥४॥

तुका म्हणे उघडें आहे हित यांत
जया जें उचित करा तैसें ॥५॥

No comments:

Post a Comment