पदी घुंगरू माझ्या,Padi Ghungaru Majhya

पदी घुंगरू माझ्या वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची,
मी होऊन झाले दासी रे !

लोक बोलती मीरा वेडी
ज्ञाती म्हणे कुलनाशी रे !

राणाजी विष प्याला देई
हासत मीरा प्राशी रे !

मीरेचा प्रभू गिरीधर नागर
सहज मिळे अविनाशी रे !

No comments:

Post a Comment