नाकात वाकडा, नथीचा आकडा
मोत्यांचं कुलूप, ओठांच्या कवाडा
बंदोबस्त का ग केलास एवढा ?
बोलांचं माणिक, हसण्याचं हिरं
रत्नांनी भरला रूपाचा वाडा
तुझ्यावाणी वेडा, घालिल दरोडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा
येऊन गुपचूप तोडीन कुलूप
अरं भलतेच नको रं बोलू उनाडा
घालिन दरोडा, धुंडीन वाडा
पायांत पडेल रं जन्माचा खोडा
सोशीन खाडा, हवा तेवढा,
आधीच कशाला तंटाबखेडा
तुझा माझा जोडा, पायि घाल खोडा
अंगणी झडू दे सनई-चौघडा
No comments:
Post a Comment