तांडा चालला रे गड्या तांडा चालला
आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला
तांडा चालला रे गड्या तांडा चालला
एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडू या
मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडू या
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला
गरिबांचा लवाजमा धीरे धीरे चालतो
पाळण्याची अंबारी बाळराजा डोलतो
आधाराच्या काठीला पिंजरा एक टांगला
वनवासी जिणं हे जल्माला लागलं
दु:खाचं काटंकुटं ठाई ठाई पेरलं
कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला
हिरवळीचा बिछाना धुक्याची रे वाकळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला
No comments:
Post a Comment