तांबुस गोरा हात साजिरा,Tambus Gora Haat Sajira

तांबुस गोरा हात साजिरा, मुठीत मोती लाख
सजणी, टाक बियाणं टाक !

बंड्या बैलाला हो हो हो हो

माझ्या बैलाला हो...

एका सकाळी, फूट कोवळी
काळ्यांत हिरवी झाक !
नाजुक लवलव तशीच वाढव
खुरपून हरळी पाक !
हिरव्या रानी, मंजुळ गाणी गात पाखरे राख !
सजणी टाक बियाणं टाक !


पांखरांची राखण नजरेची गोफण
घरच्या चोराला धाक !
पिकलेल्या मळ्यांत, रास मोज खळ्यांत

ओट्यात पुण्याई टाक !
चांदण्यांत बसून, माझ्यासंगं हसून कष्टाची गोडी चाख !
सजणी, टाक बियाणं टाक !

No comments:

Post a Comment