तंबाखूची रसाळ पोथी,Tambakhuchi Rasal Pothi

अजब गुणाची वनस्पति ही साऱ्यांनी खावी
तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी

'खा तंबाखू', 'खा तंबाखू' हुकूम देवाचा
हरिनामापरि तंबाखूने उद्धरते वाचा
तंबाखूची थोरवी साऱ्या देवांना ठावी

पंढरपुरचा विठ्ठल ठेवी कमरेवर हाता
तंबाखूचे झाड केवढे ते सांगे जगता
कमरेइतकी उंची त्याची जाणुनिया घ्यावी

गावोगावची गणेशमूर्ती चिमूट एक दावी
जगास सांगे ही तंबाखू कशी किती घ्यावी
चिमूट घ्यावी, चिमूट द्यावी, देवघेव व्हावी

हात पसरतो का व्यंकोबा देव चक्रपाणी
तंबाखूचे पान म्हणे तो तळहातावाणी
शाहीराची वाणी तुम्ही पडताळुनी घ्यावी

चिमटीहुन जर अधिक खाल तर होईल रे काय ?
हात उगारुन उभा ठाकला श्री मारुतीराय
थोबाडित तो ठेवून देईल जाण बाळगावी
संगती नेउं त्या परत पुरीसी जातां

जातांच पाहतिल हरिण सासवा, जावा
करितील कैकयी भरत आपुला हेवा
ठेवीन तोंवरी जपून गडें तो ठेवा
थांबला कशास्तव धनुर्धरा हो आतां ?

फेंकून बाण त्या अचुक जरी माराल
काढून भाउजी घेतिल त्याची खाल
त्या मगासनीं प्रभु, इंद्र जसे शोभाल
तो पहा, दिसे तो दूर टेकडी चढतां

No comments:

Post a Comment