नका तोडू पावणं जरा,Naka Todu Pavana Jara

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड, खुणावतो आंबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

अहो टोपीवाले तुम्ही फेटेवाले
टकमक टकमक बघू नका हो
मागं मागं लागू नका

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू, पावणं जरा थांबा

वान अस्सल तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला
हिरवट गोडी आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा
नका तोडू, पावणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा थोडक्यात आवरा
कईकांनी धरला दबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

आधी वाजवत होता चुटक्या
आता कशाला मारतोय मिटक्या
लघळपणाला लागाम घाला
गावात होईल शोभा
नका तोडू, पावणं जरा थांबा



No comments:

Post a Comment