नका मारु खडा, शिरी भरला घडा, सख्या जाइल तडा,
हे भिजेल गोरे अंग !
ऐके न बाइ तरी हसे खदखदा, असा कसा श्रीरंग ?
नको धरू हात रे, पिचेल माझा चुडा
सुटेल बाइ जुडा, अवखळा, भिजतिल काजळकडा
ऐके न बाइ तरि, करि नयन वाकडा !
थंडीत भरे हुडहुडी, थरकापे माझी कुडी
ती खरी सुखाची घडी
घे बळेच ओढुनि कवळि रेशमी शेला
अधरिचा मधुर मधु मेवा, मुरलीस वाटला हेवा
हे असे काय हो देवा ?
आता फुटु द्या घडा, खुशाल मारा खडा
यापुढे कधि न मी करीन हो ओरडा
No comments:
Post a Comment