नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू
लाजरिच्या रोपटिला दृष्ट नका लावू
घोटाळते पायामाजी तुरुतुरु चाल
आडतात ओठांवरी मनातले बोल
नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ
पाहील ना कुणीतरी सोडा माझी वाट
मुलुखाचे द्वाड तुम्ही निलाजरे धीट
इतुक्यावरि हासुनिया वेड नका लावू
माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन
छंदिफंदि डोळियांचे त्यात आगबाण
बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ
No comments:
Post a Comment