दिसला ग बाई दिसला,Disala Ga Bai Disala

ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसंच्या भयाण राती
काजवा उडं, किर्किर किडं, रानात सुरात गाती

दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं ?

दिसला ग बाई दिसला
मला बघून गालात हसला ग बाई हसला

गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला

माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय्‌ कौल
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला ग बाई बाई भाला उरी घुसला

अंगा-अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा
उडंल भडका, चढंल धुंदी
जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसला



No comments:

Post a Comment