दिसते मजला सुखचित्र,Disate Majala Sukhchitra

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते !

प्रीत तुझी-माझी फुलावी या फुलत्या वेलीपरी

भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते !

हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी
तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते !

स्वर्ग मिळे धरणीस येथे रंग नवे गगनांगणी
सप्तसुर लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित मागते !



No comments:

Post a Comment