तुझ्याचसाठी कितीदा,Tujhyach Sathi Kitida

तुझ्याचसाठी कितीदा ..... तुझ्याचसाठी रे
मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे

मी दुपारी सोसले ऊन माथी रे !
तुझ्याचसाठी रे
मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे

लाविल्या मंदिरी सांजवाती रे
कैक आल्या, संपल्या, चांदराती रे !
तुझ्याचसाठी कितीदा

मी जगाच्या सोडिल्या रीतभाती रे !
तुझ्याचसाठी रे
मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे

No comments:

Post a comment