तुझी भलं रं तुझी भलं रं
भलगडी दादा भलं रं
मोत्यावानी ही पिकलिया ज्वार
चांदन्यारातीचं बघा शिवार
सळसळसळ ताटं वाजवतंय वारं
हेच पीक पांग फेडणार दादा फेडणार
भलगडी दादा भलं रं
आंबराईची भवती झालर
आभाळ शेंदरी शाल भरदार
शेकोटी दावतीया रंग गुलजार
थंडीत ऊब आता देणार दादा देणार
भलगडी दादा भलंरं
नांगारली शेती गणू तात्यांनी
फुलवून काढली मुलाबाळांनी
खुरपणी केली हौसा अक्कांनी
समद्यांनी जीव हिथं लावला रं दादा लावला रं
भलगडी दादा भलं रं
मध्यान् रातीची गातुय भलं रं
डफ गाण्याचा होतुय गजर
हलगी वाजवतुया नाऱ्या मल्हार
जोमानं काम आत होणार दादा होणार
भलगडी दादा भलं रं
तुझी भलं रं तुझी भलं रं
भलगडी दादा भलं रं
शंकऱ्या मागं ऱ्हाइला
तुझी भलं रं तुझी भलं रं
भलगडी दादा भलं रं
तुका म्होरं गेला
तुझी भलं रं तुझी भलं रं
भलगडी दादा भलं रं
No comments:
Post a Comment