झन झननन छेडिल्या तारा
पदी नुपूर बोलती तटकारा
मदन मेनका मस्त मयुरी
आरसपानी रूप बिलोरी
नर्तनातूनी आवर्तन हे
उधळी रंग पिसारा
यौवनातल्या वनी ऊर्वशी
प्रणय खेळते रेशीम स्पर्शी
लहरीमधुनी बहर येऊ दे
आतुरल्या शृंगारा
सूर ताल जणू संगम झाला
शब्द सुगंधी मधात न्हाला
मुके होऊनी धुके मुलायम
बरसत अमृतधारा
No comments:
Post a Comment