जगातिल धुंडुन देवस्थान
पाहिला भाकरीत भगवान
कसली भक्ती पूजाअर्चा
पुराण, पोथ्या, कीर्तन, चर्चा
रिते उदर हे असता न लगे हरिभजनाते ध्यान
माती, पाणी, उजेड, वारा
यातुन अपुले दैव उभारा
तुम्ही आम्ही सारे मिळुनी गाऊ एकच गान
तृप्त जाहला जेथे आत्मा
तिथेच आहे तो परमात्मा
भुकेल्यास द्या अन्न राखण्या भगवंताचा मान
No comments:
Post a Comment