गंजिफा नार खेळते, डाव तुम्ही टाका
डाव टाका, नजर माझी जिंका
मदनाचा रंग दरबारी, या सवती ढाल तलवारी
चला फेका, दूर सरका, पिरतीला रोखा
डाव टाका, नजर माझी जिंका
रुपाचा गुलाबी प्याला, काठोकाठ बघा भरलेला
नका लावू हात अंगा, दुरूनी झोका
डाव टाका, नजर माझी जिंका
थयथयते रंगढंगात कस्तुरी धुंद अंगात
ओढुनी शिरी तांबडी चिरी, पळाला धोका
डाव टाका, नजर माझी जिंका
No comments:
Post a Comment