चंद्रकला रुक्मिणी नेसली
पाहता दर्पणी का हसली ?
काजळ काळे भरता डोळी
प्रतिबिंबातुन दिसू लागली
श्रीकृष्णाची मूर्त सावळी
भीमक बाला लाज लाजली
दूताकरवी पत्र धाडिले
श्रीकृष्णाने तुझ्या वाचले
गोड कपोली उत्तर आले
प्रीत कंचुकी तिला बोलली
वधू नियोजित ती शिशुपाला
मुहूर्त मंगल समीप आला
उभी राऊळी उदास बाला
तोच हरिची मुरली वाजली
No comments:
Post a Comment