देवावाणी शेत माझं, नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानी शिंपली
बाळरूप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माऊलीनं दिनरात पोसलं
तरारुन आला भरा गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं
चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं
मोतीवरी रंगली ढंगदार लावणी
घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
लक्षुमी ही देखणी रूप तिनं दावलं
दिवसाच्या डोळियात नाही बघा मावलं
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं
No comments:
Post a Comment