कुरवाळू का सखे मी,Kuravalu Ka Sakhe Mi

कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
झाले तुझी जिथे मी, भय कोणते, कशाचे

का झाकितेस डोळे, का वेळतेस माना
गुंफून पाच बोटे, का रोखिसी करांना
माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

वाऱ्यावरुन येतो मधुगंध मोगऱ्याचा
तो गंध आज झाला, निःश्वास भावनांचा
तुज शोभते शुभांगी, चातुर्य संयमाचे

एकांत शांत आहे, दोन्ही मने मिळाली
प्रीती मना-मनांची, दोघांसहि कळाली
जागेपणी सुखावे, हे स्वप्न प्रेमिकांचे

No comments:

Post a Comment