कुत्‍ना थमाल ले थमाल,Kutna Thamal Le Thamal

कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासि जातो भाई ॥१॥

तुम्ही थोलल्या पातलाचे लेक ।
तुम्हांमधले मी गलीब आहे एक ।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख ।
किती मी धावूं ले कातां लागला पायी ॥२॥

काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धवली गाय पलाली ।

मदला देखुनी तो गवली हाका माली ।
काली कांबली हिलुनि घेतली थाली ॥३॥

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥

कुत्‍ना म्हणे ले 'उगा राहि बोबड्या गा' ।
तुझ्या गायी ले मीच वळवितो गड्या ।
नाहितल धाडिन ले गोपालांच्या जोड्या ।
नामा म्हणे ले गोष्ट रोकडी पाही ॥५॥

No comments:

Post a Comment