छन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे त्याचं मानूस हे नाव
आच लागता आगीची वाढे झळाळ सोन्याचा
घसाघस घासल्यानं गंध दुना चंदनाचा
झाड तोडल्याने वाढे, हा तो थोरांचा स्वभाव
चिमुकल्या लेकरईचा छळ पंडिताने केला
आळंदीच्या बालकाले बालपणा नको झाला
पुढं वाढलं वाढलं ज्ञानराजाचं वैभव
मानखंडना संताप सारा गाव उलटला
वह्या तरता पान्यात पुन्हा गुरू पालटला
तुका देवाइतुका वाटे एक महान वैष्णव
आळ चोरीचा घेतला, चोप देला बडव्यानं
विठ्ठलाचा हार चोख्या सांग लपवला कोन
त्याच चोखोबाच्या घरी जेवे वैकुंठीचा देव
No comments:
Post a Comment