दाटु लागली उरात चोळी
कुठवर आता जपायचं
औंदा लगीन करायचं
मला, औंदा लगीन करायचं
रस्त्यानं जाताना बघत्यात किती
गालातल्या गालात हसत्यात किती
पदर सारखा ढळतोय ग
किती तयाला आवरायचं
मनात ठसतोय कुणीतरी
उरात होतंय् कसंतरी
झोप रातिला येइना मुळी
सपनांत कुनितरि बघायचं
धक्का मारत्यात रस्त्यामधी
खळबळ होतिया मनामधी
मनासारखा हवा गडी
कुठवर बाई थांबायचं
No comments:
Post a Comment