पुनव पुसाची आली आता
साल सोळावं सरायचं
कुठवर चोरून फिरायचं... औंदा लगीन करायचं !
आई कोण ? बाबा कोण ?
साक्षीदार पाहिजेत तीन
रस्त्यावरचं धरायचं;
कुठवर चोरून फिरायचं... औंदा लगीन करायचं !
सरकारात जाऊन, नावगाव लिहून
पाच रुपये तिथं भरायचं
साल सोळावं सरायचं
कुठवर चोरुन फिरायचं... औंदा लगीन करायचं !
न्हाई मांडव; नको वऱ्हाड
पहिल्या रातीत नवं बिऱ्हाड
एकमेकांमधी मुरायचं
कुठवर चोरुन फिरायचं... औंदा लगीन करायचं !
No comments:
Post a Comment