ओंजळीत माझ्या माझे उसासे,Onjalit Majhya Majhe Usase

ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे !

कंठात हुंकार परतून गेले
तळ्व्यात अश्रू किती वेचलेले
कसे मीच माझे अवसान होते
स्वप्नास माझ्या माझे दिलासे
आणि भोवताली आभाळ भासे !


दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा
जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवताली आभाळ भासे !



No comments:

Post a Comment