अंधाराची खंत तू,Andharachi Khant Tu

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे ?
गा प्रकाशगीत !

रोज नवी ही उषा उगवते
कवच भेदुनी अंधाराचे
कळीकळीच्या कोषामधुनी
निसर्ग गातो गीत उद्याचे
संजीवन हसते नाशामधुनी, हीच जगाची रीत !


दु:ख निराशा दूर सारुनी
सदा पडावे पाउल पुढती
गतकाळाची कशास भीती ?
भविष्य अपुले अपुल्या हाती
फुलव निराळे तुझ्या मुठीतुनी, तूच तुझे संचीत !

No comments:

Post a Comment