Showing posts with label S-सरस्वतीबाई राणे. Show all posts
Showing posts with label S-सरस्वतीबाई राणे. Show all posts

ओळखली मी आपुल्या OLAKHALI MI AAPULYA

ओळखली मी आपुल्या मनिंची ही भावना

मजसम सहचरी तुम्हा हवी ना!

मधुर प्रीतिचा अनुभव घ्याया

ओढ लागली ही मनिं आपुल्या

धीर धरा परि त्या शुभसमयाला

सुखविण्या जीवना!


Lyrics -जी. के. दातार G.K. DATAR
Music -श्रीधर पार्सेकर SHRIDHAR PARSEKAR
Singer -सरस्वतीबाई राणे SARASWATIBAI RANE

जा घेउनि संदेश JA GHEUNI SANDESH

जा घेउनि संदेश पांखरा
मानसीच्या राजहंसा, जा रे

मोत्यावरचे मोहक पाणी
साठविले मी शाई म्हणुनी
मुग्ध कळीची करुनि लेखणी
आळविला निज देश

कमलदलावर हृदय ओतिले
नकळत त्याचे अक्षर झाले
प्रेमपत्र हे पहिलेवहिले
मदनाचा आदेश

Lyrics -राजा बढे RAJA BADHE
Singer -सरस्वतीबाई राणे  SARSWATIBAI RANE