जा घेउनि संदेश JA GHEUNI SANDESH

जा घेउनि संदेश पांखरा
मानसीच्या राजहंसा, जा रे

मोत्यावरचे मोहक पाणी
साठविले मी शाई म्हणुनी
मुग्ध कळीची करुनि लेखणी
आळविला निज देश

कमलदलावर हृदय ओतिले
नकळत त्याचे अक्षर झाले
प्रेमपत्र हे पहिलेवहिले
मदनाचा आदेश

Lyrics -राजा बढे RAJA BADHE
Singer -सरस्वतीबाई राणे  SARSWATIBAI RANE


No comments:

Post a Comment