Showing posts with label S-पु. ल. देशपांडे. Show all posts
Showing posts with label S-पु. ल. देशपांडे. Show all posts

ललना कुसुम कोमला, Lalna Kusum Komala

ललना कुसुम कोमला । होई अकारण हृदयी व्याकुळ
साहिल कधि का ऐशा कृतिला ॥

जन्मजन्मांतरी धरुनि जी आस अंतरी ।
जीवन कटु हें मधुर मानिती । मातृहृदया ना तुला ॥

बाई या पावसानं लावियली,Bai Ya Pavasane Laviyali

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !

पांखरा जा त्यजुनिया,Pakhara Ja Tyajuniya

पांखरा । जा । त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया ॥
पसरले विश्व अपार पहा ॥

भेदुनि गगनाला । बघुनि ये देवलोक सारा ।
पिऊनी अमृत, घेउनि संचित । परतुनि ये घरा ॥