घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी
वेळुच्या बनात चाले वाऱ्याचे गायन
पाचोळ्याने भवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणी
दुरावर ऐकु येई सागराचे गीत
निळे निळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनी वाणी
वाऱ्यामध्ये ऐकु येई तुझे कान गूज
चंद्र सूर्य ताऱ्यामाजी प्रभू तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी
No comments:
Post a Comment