Showing posts with label लाखाची गोष्ट (१९५२). Show all posts
Showing posts with label लाखाची गोष्ट (१९५२). Show all posts

लाज वाटे आज बाई,Laaj Vate Aaj Bai

लाज वाटे आज बाई, वाटतो आल्हादही
व्हवयाची भेट त्यांची व्हायचा संवादही

जवळ येते ती घडी अन्‌ दूर जातो धीर का ?
भरुनि येती उगीच डोळे कंप देही सारखा
भास होतो पावलांचा कानि येते सादही
व्हवयाची भेट त्यांची, व्हायचा संवादही

दोन भुवया या कमानी, पापण्यांची तोरणे
प्रियकराच्या स्वागतासी सिद्ध झाली लोचने
जीव थांबे लोचनी त्या, ना तनूची दादही
व्हवयाची भेट त्यांची, व्हायचा संवादही

माझा होशिल का,Majha Hoshil Ka

सांग तू, माझा होशिल का ?

वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का ?

नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या, ओठां देशिल का ?

दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नाव गुंतवीत तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का ?



पहिले भांडण केले कोणी,Pahile Bhandan Kele Koni

पहिले भांडण केले कोणी ?
सांग ना राजा, कशी रुसून गेली राणी !

अडखळला का पाय जरा
वळता गळला का गजरा
लटका होता राग मुखावर, डोळ्यांत लटके पाणी !

मान वेळता खेळ कळे
दंवात फुलले दोन कळे
थरथरणारे ओठ जहाले क्षणात हसल्यावाणी !

कलह प्रीतिचा गोडीचा
विलास जमल्या जोडीचा

विरह नकोसा, तरिही सुंदर, जीव गुंतता दोन्ही !

त्या तिथे पलिकडे तिकडे,Tya Tithe Palikade Tikade

त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !

गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे

कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत ते केवढे !

तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग जो
तिथे मनास सापडे