पहिले भांडण केले कोणी ?
सांग ना राजा, कशी रुसून गेली राणी !
अडखळला का पाय जरा
वळता गळला का गजरा
लटका होता राग मुखावर, डोळ्यांत लटके पाणी !
मान वेळता खेळ कळे
दंवात फुलले दोन कळे
थरथरणारे ओठ जहाले क्षणात हसल्यावाणी !
कलह प्रीतिचा गोडीचा
विलास जमल्या जोडीचा
विरह नकोसा, तरिही सुंदर, जीव गुंतता दोन्ही !
No comments:
Post a Comment