लाज वाटे आज बाई,Laaj Vate Aaj Bai

लाज वाटे आज बाई, वाटतो आल्हादही
व्हवयाची भेट त्यांची व्हायचा संवादही

जवळ येते ती घडी अन्‌ दूर जातो धीर का ?
भरुनि येती उगीच डोळे कंप देही सारखा
भास होतो पावलांचा कानि येते सादही
व्हवयाची भेट त्यांची, व्हायचा संवादही

दोन भुवया या कमानी, पापण्यांची तोरणे
प्रियकराच्या स्वागतासी सिद्ध झाली लोचने
जीव थांबे लोचनी त्या, ना तनूची दादही
व्हवयाची भेट त्यांची, व्हायचा संवादही

No comments:

Post a Comment