Showing posts with label माणसाला पंख असतात (१९६०). Show all posts
Showing posts with label माणसाला पंख असतात (१९६०). Show all posts

रम्य अशा स्थानी,Ramya Asha Sthani

रम्य अशा स्थानी,
रहावे रात्रंदिन फुलुनि !

मंजुळ घंटा सांज सकाळी,
गोकुळ गीते गातिल सगळी
हो‍उनि स्वप्नी गौळण भोळी,
वहावे यमुनेचे पाणी !

रंगवल्लिका उषा रेखिते,
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते,
पहावे अनिमिष ते नयनि !

स्वैर पवन मग होईल विंझण,
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
सृष्टीसखीची हो‍उनि मैत्रिण,
फिरावे गात गोड गाणी !

ये जवळी घे जवळी,Ye Javali Ghe Javali

ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा

निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता

चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा



पंख हवे मज पोलादाचे,Pankha Have Maj Poladache

पंख हवे मज पोलादाचे
शूर लढाऊ जटायुचे

सीतेपरि जो हरण करोनी
असाह्य अबला नेईल कोणी

काळ फेक ती तिथे घालुनी
शील रक्षिण्या स्त्री जातीचे

निज जननीला मुक्त कराया
गरूड मागता अमृत ठेवा
तुच्छे हासता इंद्र देवा
वज्र तोडण्या त्या इंद्राचे

गर्भ पिलांना सागर गिळता
क्रोधे उठली पक्षिण टिटवी
जळा पेटवी सागर आटवी
आगस्तीच्या सामर्थ्याचे

देशिल का रे मजला क्षणभर,Deshil Ka Re Majala

देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर

मधुर फळांवर मोहरलेली
पर्णांतरी ही पल्लवलेली
चुंबीत राहीन लज्जीत लाली
तुझ्यासवे मी वृक्षलतेवर

तव स्पर्शाने पुष्पकवीणा
भाव मधुर ही सुस्वरताना
हास्य सुगंधीत सख्या मोहना
उधळीत राहू गीत फुलावर

दमयंतीच्या प्रेमळ दूता

पंख तुझे ते मला लाभता
प्रिया भेटण्या ही आतुरता
घेत भरारी बघ वायुवर