रम्य अशा स्थानी,Ramya Asha Sthani

रम्य अशा स्थानी,
रहावे रात्रंदिन फुलुनि !

मंजुळ घंटा सांज सकाळी,
गोकुळ गीते गातिल सगळी
हो‍उनि स्वप्नी गौळण भोळी,
वहावे यमुनेचे पाणी !

रंगवल्लिका उषा रेखिते,
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते,
पहावे अनिमिष ते नयनि !

स्वैर पवन मग होईल विंझण,
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
सृष्टीसखीची हो‍उनि मैत्रिण,
फिरावे गात गोड गाणी !

No comments:

Post a Comment