Showing posts with label पुत्र व्हावा ऐसा (१९६१). Show all posts
Showing posts with label पुत्र व्हावा ऐसा (१९६१). Show all posts

बघता हसुनी तू मला,Baghata Hasuni Tu Mala

बघता हसुनी तू मला
का लाज वाटे मला

नकळत कितीदा येऊन मी
बसले तुजला बिलगुन मी
आज परी मी आतुरलेली तुजजवळी यायला

हसता रुसता फुललेली
गोड कपोली खुललेली
मधुमासांची मोहक लाली, आज ती बघायला

बावरले मी जवळी ये
स्वप्नी आपुल्या मजला ने
बोल मनीचे अबोल राणी, येता बोलायला



दिव्यत्वाची जेथ प्रचिती,Divyatvachi Jeth Prachiti

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती

जिथे सागरा धरणी मिळते,Jithe Sagara Dharani Milate

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदीशी एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी
धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी
प्रीतजीवना ओढ लागते